MLA Disqualification Case | अपात्रतेचा निकाल कसा असणार?, ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम स्पष्टच बोलले

MLA Disqualification Case Hearing | संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेला असा शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय आज (10 जानेवारी) लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज चार वाजता हा निर्णय देणार आहेत. तत्पूर्वी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी आजचा निर्णय ‘कुछ खूशी कुछ गम,’ असाच राहणार असल्याचं सांगितलंय.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल (MLA Disqualification Case Hearing) वेगवेगळा येण्याची शक्यता आहे.  आयाराम-गयाराम थांबवण्यासाठी आणि दहावे परिशिष्ट बळकट करण्यासाठी हा निकाल महत्वाचा असणार आहे. आजच्या या निकालाचे भविष्यात दूरगामी परिणाम आपल्याला दिसायला मिळतील. आज जो निर्णय येणार आहे त्याचा राहुल नार्वेकर फक्त ऑपरेटिव्ह पार्ट वाचून दाखवणार आहेत. त्याचा पूर्ण निकाल यायला काही वेळ लागेल. परंतु आज ऑपरेटिव्ह पार्टमध्ये ही गोष्ट स्पष्ट होईल की, कोण जिंकलं आणि कोण हरलं.

आता कोण जिंकलं आणि कोण हरलं याहीपेक्षा महत्त्वाचा पार्ट म्हणजे दहाव्या परिशिष्टांमधील तरतुदींचा संदर्भ आणि अर्थ नार्वेकर कशा रीतीने लावतात हे बघणं निश्चित उत्सुकतेचे ठरेल. माझ्या मते काही पिटीशन्स काही तांत्रिक कारणाकरिता नामंजूर होऊ शकतात किंवा फेटाळली जाऊ शकतात. तर, काही पिटीशन्स मंजूर केली जाऊ शकतील. आता यात नामंजूर कोणती करतील आणि मंजूर कोणती करतील हे आज जरी सांगता येणार नसलं तरी नार्वेकर तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नाही असं सबळ कारण देऊन हे पिटीशन डिसमिस करू शकतात, असे उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.

राहुल नार्वेकर देणार निर्णय

पुढे उज्ज्वल निकम यांनी म्हटले कि, या सर्व प्रकरणामध्ये गमतीचा भाग असा की याची सुरुवात 16 आमदारांच्या अपात्रतेपासून झालीये. त्यात मध्यंतरीच्या काळात या दोन्ही गटाच्या आमदारांनी व्हीप बदलले होते. सुनील प्रभू यांचा व्हीप सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरला आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती त्यांनी अग्राह्य ठरवली. परंतु हे करत असताना सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्ष कोणाकडे होता, हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना दिला. त्यामुळे हा निकाल (MLA Disqualification Case Hearing) म्हणजे कुछ खूशी कुछ गम काहीसा असाच असणार आहे.

त्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना काही महत्वाची निरीक्षणे नोंदवली होती. आता राहुल नार्वेकर न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांचे पालन करणार? की अध्यक्षांकडे तोंडी आणि लेखी पुरावे दाखल करण्यात आले, त्याच्या आधारे आजचा निर्णय (MLA Disqualification Case Hearing) देणार ते बघणे उत्सुकतेचे ठरेल, असं मत्र कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.

आज राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामध्ये शिवसेना पक्ष नेमका कुणाचा, व्हिप कोणाचा, पक्षांतर बंदी कायदा या तीन मुद्यांवर स्पष्टता मिळणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना निर्णयाची प्रतिक्षा असेल.

News Title- MLA Disqualification Case Hearing

महत्वाच्या घडामोडी :

Shivsena MLA Disqualification Case l ‘महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार’; बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

MLA Disqualification Case | वकील असिम सरोदे यांचा अपात्रतेच्या निकालापूर्वी गंभीर सवाल; म्हणाले…

Mla Disqualification | आमदार अपात्रतेबाबत संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा!

Rain Alert l पुणेकरांनो… कोणत्या भागात किती पाऊस पडला पहा क्लिकवर

Ira khan | आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शाही विवाह; उदयपूरमध्ये दुसऱ्यांदा करणार लग्न