Aishwarya Rai नेच ‘तो’ सल्ला दिला, अभिषेक बच्चनकडून मोठा खुलासा…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबदल दिवसेंदिवस चर्चा सुरु आहेत. प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री अलीकडच्या काळात तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय या ऐश्वर्याच्या वागणूकीबाबत बच्चन कुटुंबांतील काही व्यक्तींनी तक्रार केली होती.

अभिषेक बच्चनने केला खुलासा-

घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिषेक बच्चनने एक नवा खुलासा केला. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आणखी चर्चा सुरु झाल्यात. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना अभिषेक म्हणाला की, हे बदकाच्या पाठीवरून पाणी काढण्यासारखे आहे…याचा अर्थ असा की एखाद्यावर टीका सतत होत असेल. मात्र, त्या टीकेपेक्षा त्याला मिळालेले प्रेम आणि प्रशंसा कितीतरी पट अधिक असते.

पुढे तो म्हणाला की, आपण कायम आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. ऐश्वर्याने (Aishwarya Rai) मला एक सल्ला दिला आहे, जो मी पाळत असतो, तिने मला सांगितलं की, नकारात्मक गोष्टींपासून दूर रहायचं असतं.

ऐश्वर्याच्या सल्ल्याची चर्चा-

अभिषेक म्हणाला की, माझ्यामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये (Aishwarya Rai) छोट्या मोठ्या गोष्टीवरुन मतभेद होत असतात. मात्र आम्ही हे मतभेद आपआपसात मिटवून घेतो. कधी कधी मला ऐश्वर्या देखील चांगल्या गोष्टींचे सल्ले देत असते. अभिषेकने केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

खरोखर घटस्फोट होणार का?

अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा खरोखर घटस्फोट होणार का? असा प्रश्न पडत आहे. दरम्यान, या दोघांना देखील घटस्फोटाबाबत कायम प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र अजूनही ऐश्वर्या आणि अभिषेक किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी याबाबत भाष्य केलेलं नाहीये.

ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंब सर्वजण एकत्रित मिळून अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात. शिवाय दोन दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, लेक आराध्या बच्चन, अमिताभ बच्चन हे सगळे मिळून कबड्डी मॅच पहायला गेले होते. दरम्यान, यावेळेस सगळे आनंदी असतानाचं चित्र बघायला मिळालं. यामुळे खरंच ऐश्वर्या-अभिषेक घटस्फोट घेणार आहेत की निव्वळ चर्चा आहेत, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

News Title : aishwarya rai suggested me abhishek revealed

महत्त्वाच्या बातम्या-

Vijay Sethupathi | अवॉर्ड शोचा किस्सा सांगत विजय सेतूपतीने केला मोठा खुलासा!

MLA Disqualification | मोठी बातमी! निकालाआधी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

IPL 2024 Start Date l या तारखेपासून होणार IPL च्या सामन्यांचा जल्लोष सुरु

Shivsena MLA Disqualification Case l ‘महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार’; बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

MLA Disqualification Case | वकील असिम सरोदे यांचा अपात्रतेच्या निकालापूर्वी गंभीर सवाल; म्हणाले…