Vijay Sethupathi | अवॉर्ड शोचा किस्सा सांगत विजय सेतूपतीने केला मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Sethupathi | विक्रम, जवान, मास्टर , 96 या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आपल्या आगामी चित्रपट ‘मेरी क्रिसमस’ (Merry Christmas ) मुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात विजय सेतूपतीबरोबर अभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina Kaif) दिसून येणार आहे. कॅटरिना आणि विजय सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच विजय सेतूपतीने एक मजेशीर किस्सा सांगितला जो ऐकून कुणालाही हसू सुटेल. खरे तर, विजय सेतूपती हा अवॉर्ड शो पासून दूर राहणेच पसंत करतो. त्यामुळे तो कोणत्याच अवॉर्ड शोमध्ये दिसून येत आहे. या संबंधीच एक मनोरंजक किस्सा त्याने सांगितला.

“मॅडम मी येऊ नाही शकत नाही…”

बॉलीवूड अभिनेता आमिर खान कोणत्याच अवॉर्ड शो मध्ये आपली हजेरी लावत नाही. त्याचप्रमाणे विजय सेतुपती (Vijay Sethupathi) देखील अनेक अवॉर्ड शो पासून दूर राहणे पसंत करतो. अशातच एक दिवस त्याला एका अवॉर्ड शोचे इनविटेशन आले होते. या अवॉर्ड शोमध्ये न जाण्यासाठी त्याने एक मजेशीर बहाणा बनवला होता. हा बहाणा ऐकून कुणालाही हसू फुटेल, असा होता.

विजयने चक्क “मॅडम मी येऊ नाही शकत नाही. कारण, माझ्याकडे कार्यक्रमात घालायला कपडेच नाहीये.”, असं म्हणत या इन्विटेशनला झुगारून लावले होते. त्याने खोटे बोलून कार्यक्रमाला जाणे टाळले होते.

‘या’ तारखेला प्रदर्शित होणार Merry Christmas |

पुढे त्याला तू कोणत्या अभिनेत्याचा फॅन आहेस असा प्रश्न विचारण्यात आला. यावर विजय सेतुपतीने (Vijay Sethupathi) मी कुणाचाच फॅन नसल्याचं सांगितलं. मी जर कुणाचा फॅन झालो तर मी फक्त त्या अभिनेत्याचंच काम बघेल आणि हे कोणत्याही कलाकारासाठी योग्य नसल्याचं त्याने म्हटलंय.

‘मेरी क्रिसमस’ (Merry Christmas ) हा चित्रपट येत्या 12 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात राधिका आपटे आणि अश्विनी काळसेकर देखील दिसणार आहेत. श्रीराम राघवन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. कॅटरीना आणि विजय सेतूपतीच्या चाहत्यांकडून चित्रपटाची आतुरतेने वाट पहिली जात आहे.

News Title- Merry Christmas fame Vijay Sethupathi exposure

महत्त्वाच्या बातम्या-

‘…म्हणून मी आडनाव बदलून टाकलं ‘; Pankaj Tripathi यांचा मोठा खुलासा!

Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे’; बड्या पदाधिकाऱ्याचा अमित ठाकरेंवर गंभीर आरोप

Entertainment News | बाॅलिवूडवर शोककळा, ‘या’ प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास

Ranveer Singh ला ‘ती’ पोस्ट पडली महागात; सोशल मीडियावर होतोय ट्रोल

Mla Disqualification | ‘हे तर धक्कादायक आहे’; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य