MLA Disqualification | मोठी बातमी! निकालाआधी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर (MLA Disqualification) आज निकाल लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाचे 16 आमदार अपात्रतेवर निकाल सादर करणार आहेत. मात्र निलाकालाआधी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल येणार आहे. मात्र याआधी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

MLA Disqualification | मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी नवीन निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांना आनंदाची शिधा मिळणार आहे. तसेच राज्याच कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपटाबाबत (Satyashodhak Movie) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचे सर्वस्तरावरून कौतुक केलं जात आहे. या निर्णयामुळे चित्रपटाच्या टीमला मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मागणी केली होती.

आमदार अपात्रेचा ऐतिहासिक निकाल लागणार

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेचा ऐतिहासिक निकाल आज येणार आहे. या निकालापूर्वी हालचालींना वेग आला आहे. सहा भागांत हा निकाल देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान होणार आहे. पण ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं. तसेच या निर्णयामुळे सरकार देखील धोक्यात येऊ शकतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Shivsena MLA Disqualification Case l ‘महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार’; बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

MLA Disqualification Case | वकील असिम सरोदे यांचा अपात्रतेच्या निकालापूर्वी गंभीर सवाल; म्हणाले…

Mla Disqualification | आमदार अपात्रतेबाबत संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा!

Rain Alert l पुणेकरांनो… कोणत्या भागात किती पाऊस पडला पहा क्लिकवर

Ira khan | आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शाही विवाह; उदयपूरमध्ये दुसऱ्यांदा करणार लग्न