Shiv Sena MLA Disqualification Case | शिवसेना आमदाराच्या अपात्रतेवर आज निर्णय होत आहे. यावेळी निकाल कुणाच्या बाजूने जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे. विधानसभा अध्यक्ष कोणत्या गटाच्या बाजूने निर्णय देतात याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र निकालाआधीच हा निकाल कुणाच्या बाजूनं लागणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
ठाकरेंचा प्लॅन बी तयार?
हा निकाल (maharashtra mla disqualification) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणी वेळी केलेल्या काही चुका हेरून हा निकाल देण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र निकाल विरोधात लागला तरी ठाकरेंकडे प्लॅन बी तयार असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या विरोधात गेल्यास ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जर निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर सुप्रीम कोर्टात जाणं हा ठाकरेंचा प्लॅन बी तयार असल्याचं सांगण्यात येत आहे.
“निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल”
निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल असं म्हणत तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (MLA Disqualification Case) प्रतिक्रिया दिलीय आहे.
निकाल शिंदेंच्याच बाजू लागणार?
दरम्यान, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा शिंदेंच्या बाजूने आणि ठाकरेंच्या बाजूने लागणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. ठाकरे गट जर या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेला तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये याचीही खबरदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Rashmi Shukla | आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी मोठी बातमी समोर!
Maharashtra Politics | “ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार”, निकालाआधीच आलेल्या दाव्याने मोठी खळबळ
LIC Jeevan Kiran Yojna l LIC ची ही भन्नाट योजना देईल बक्कळ पैसा; मिळेल सात पट रिटर्न्स
Rahul Narvekar | “उद्या ते निकाल अमेरिकेतून आणलाय असंही म्हणू शकतात”