Shiv Sena MLA Disqualification Case | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र निकालाआधीच हा निकाल कुणाच्या बाजूनं लागणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनूसार हा निकाल एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बाजूनं लागण्याची शक्यता असल्याची खात्रीलायक माहिती आहे. याबाबत विविध माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
शिवसेनेत (Shiv Sena) मोठी फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण निवडणूक आयोगात गेल्यानंतर एकनाथ शिंदेंना पक्षचिन्ह आणि नाव मिळालं तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नवं नाव आणि पक्षचिन्ह निवडावं लागलं, मात्र आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेली. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण प्रलंबित होतं आणि त्यावर आज निकाल येणार आहे.
मॅच फिक्स असल्याचा आरोप
दरम्यान, हा निकाल (maharashtra mla disqualification) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सत्ताधारी नाही तर विरोधी पक्षातील नेत्यांचाही तोच कयास आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मॅच फिक्सिंग झाल्याचा दावा केला आहे, त्यामुळे या प्रकरणी निकाल काय लागणार?, याचं चित्र स्पष्ट असल्याचं मानलं जात आहे.
नार्वेकरांच्या निकालात काय?
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणी वेळी केलेल्या काही चुका हेरून हा निकाल देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा निकाल सरळ सरळ उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात जाणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना सर्वोच्च न्यायालयात काही अडचण येऊ नये याची कायदेशीर काळजी घेतल्याची माहिती सुद्धा आहे.
दुसरीकडे, आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल (MLA Disqualification Result) ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर ते सर्वोच्च न्यायालयात जातील, त्यामुळे याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांना सुद्धा निकालानंतर न्यायालयात जाण्याची वेळ येऊ शकते, त्यांच्यासोबतच महायुतीच्या सरकारलाही कोणतीच अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आता विधानसभा अध्यक्षांनी (Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar) निकाल जाहीर करण्याची औपचारिकता असल्याचं सांगितलं जातंय. प्रत्यक्ष हा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
News Title: Shiv Sena MLA Disqualification Case Secret info
महत्त्वाच्या बातम्या-
Maharashtra Politics | “ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार”, निकालाआधीच आलेल्या दाव्याने मोठी खळबळ
LIC Jeevan Kiran Yojna l LIC ची ही भन्नाट योजना देईल बक्कळ पैसा; मिळेल सात पट रिटर्न्स
Rahul Narvekar | “उद्या ते निकाल अमेरिकेतून आणलाय असंही म्हणू शकतात”
Aishwarya Rai नेच ‘तो’ सल्ला दिला, अभिषेक बच्चनकडून मोठा खुलासा…