Rashmi Shukla | आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी मोठी बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rashmi Shukla | शिवसेना आमदार अपात्रतेच्या निर्णयाला काहीच वेळ असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.

आमदार अपात्रतेच्या निर्णयापूर्वी म्हणजेच काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेले. आता रश्मी शुक्ला या फडणवीसांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांन अजूनच वेग आला आहे. रश्मी शुक्ला नेमकं कोणत्या कारणासाठी गेल्या याबाबत आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

रश्मी शुक्ला ‘सागर’ बंगल्यावर

एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर झालेली बैठक मराठा आरक्षणाच्या मोर्चाबाबत झाल्याचे म्हटले गेले. कारण या बैठकीत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही उपस्थिती होती. मात्र, निर्णय लागण्याच्या एक दिवसाआधी बैठक झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आज पुन्हा एकदा रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने चर्चा रंगत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र्राचे लक्ष लागलेल्या या आमदार अपात्रतेच्या निर्णयासाठी मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

अपात्रतेच्या निर्णयाचं मॅचफिक्सिंग?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज (१० जानेवारी) दुपारी चार वाजता आमदार अपात्रतेचा निर्णय देणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं असल्याचं म्हणत गंभीर आरोप केला आहे.

एकीकडे ठाकरे गटाकडून निर्णयाबाबत संशय व्यक्त केला जात असतानाच रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता राजकीय पक्षासोबतच नागरिकांनाही या निर्णयाची ओढ लागली आहे. राहुल नार्वेकर या महत्वपूर्ण निकालाचे (MLA Disqualification Case) वाचन करणार आहेत. एकूण 500 पानांच्या निकाल पत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल ते वाचून दाखवतील. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या निकालाकडेच असणार आहे.

News Title- Rashmi Shukla meets Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या- 

Maharashtra Politics | “ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार”, निकालाआधीच आलेल्या दाव्याने मोठी खळबळ

LIC Jeevan Kiran Yojna l LIC ची ही भन्नाट योजना देईल बक्कळ पैसा; मिळेल सात पट रिटर्न्स

Rahul Narvekar | “उद्या ते निकाल अमेरिकेतून आणलाय असंही म्हणू शकतात”

MLA Disqualification Case | अपात्रतेचा निकाल कसा असणार?, ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम स्पष्टच बोलले

Aishwarya Rai नेच ‘तो’ सल्ला दिला, अभिषेक बच्चनकडून मोठा खुलासा…