Shiv Sena MLA Disqualification | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ठाकरेंना पहिला धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shiv Sena MLA Disqualification | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल वाचनाला  (MLA Disqualificatio) सुरुवात केली आहे. राहुल नार्वेकर सर्वात पहिले खरी शिवसेना कोणाची याबाबत निर्णय देत आहेत. निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहे. अध्यक्षांनी खरी शिवसेना कुणाची हे सांगण्यासाठी घटनेचा आधार घेतला आहे आहे. यावेळी अध्यक्षांनी ठाकरेंना पहिला धक्का दिला. शिवसेनेची 2018 सालची घटनादुरुस्ती मान्य नसल्याचं मोठं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलं आहे.

2018 मध्ये घटनेच्या दुरूस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही सर्वांच्या संमतीने झाली आहे. पण याबाबत निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्यामुळे ही घटना ग्राह्य धरणार नाही, तर जुनी घटना 1999 सालची ग्राह्य धरणार आहे, असं अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं आहे.

2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण, 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी निकालवाचनात स्पष्ट केलं आहे.

दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागितली गेली, पण दोन्ही गटांकडून घटना प्राप्त झाली नाही. अखेर निवडणूक आयोगानं दिलेली शिवसेनेच्या घटनेची प्रत ग्राह्य धरली जाईल, असं अध्यक्षांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Shiv Sena MLA Disqualification LIVE | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल वाचा जसाच्या तसा

Shiv Sena MLA Disqualification Case | निकाल विरोधात लागला तरी ठाकरेंचा प्लॅन बी तयार, अशी असणार योजना

Rashmi Shukla | आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी मोठी बातमी समोर!

Shiv Sena MLA Disqualification Case | एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं लागणार निकाल?, सर्वात मोठी माहिती आली समोर

Maharashtra Politics | “ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार”, निकालाआधीच आलेल्या दाव्याने मोठी खळबळ