Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंचा स्वत:च्याच पायावर धोंडा?; ‘ती’ चूक पडली महागात

Maharashtra Politics | राज्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकालाचे (Shiv sena MLA Disqualification Verdict Final result) वाचन सध्या सुरू आहे. यावेळी अध्यक्षांनी नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना त्यांची चूक दाखवून दिली आहे. यावेळी नार्वेकरांनी ठाकरेंना मोठा झटका दिलाय.

ठाकरेंना ‘ती’ चूक पडली महागात

विधानसभा अध्यक्षांकडे ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्र दाखल केलं. परंतु प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर उलट तपासणीला आले नाही. यामुळे राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या या चुकीवर बोट ठेवलं आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रद्द ठरवलंय. उद्धव ठाकरे उलटतपासणीला आले नाहीत, म्हणून ठाकरे गटाचं प्रतित्रज्ञापत्र अमान्य आहे असं ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे यांनी दिलेली घटना ग्राह्य धरता येणार नाही. निवडणूक आयोगानं दिलेली घटनेची प्रत वैध आहे. 2023 मध्ये निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मिळाली. 2018 साली घटनेत केलेले बदल वैध धरता येणार नाहीत, असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी महत्वाचं निरिक्षण नोंदवलं.

उद्धव ठाकरे उलटतपासणीला आले नाहीत, म्हणून ठाकरे गटाचं प्रतित्रज्ञापत्र अमान्य आहे. 10 व्या सूचीनुसार मला फक्त राजकीय नेतृत्व बघायचं आहे. दोन्ही गटाने पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या. 1999 मध्ये निवडणूक आयोगात असलेली प्रत ग्राह्य धरली गेली. पक्षाचा प्रमुख कोण? फक्त आणि फक्त इतकंचं ठरवणार आहे, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही. 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. पक्षात दोन गट पडल्याचं 22 जून रोजी लक्षात आलं. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच आहे, असंही नार्वेकर म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Shiv Sena MLA Disqualification | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ठाकरेंना पहिला धक्का!

Shiv Sena MLA Disqualification LIVE | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निकाल वाचा जसाच्या तसा

Shiv Sena MLA Disqualification Case | निकाल विरोधात लागला तरी ठाकरेंचा प्लॅन बी तयार, अशी असणार योजना

Rashmi Shukla | आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी मोठी बातमी समोर!

Shiv Sena MLA Disqualification Case | एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं लागणार निकाल?, सर्वात मोठी माहिती आली समोर