तनुश्री दत्ताचा Emraan Hashmi बाबत मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Emraan Hashmi | अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) काही वर्षांपूर्वी ‘मी टू’ मोहिमेमुळे चर्चेत आली होती. तीने बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांवर गंभीर आरोप केले होते. त्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्याबाबत तिने अनेक खुलासे केले होते. आता तीने तब्बल 18 वर्षांनंतर अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) बद्दल मोठा खुलासा केला आहे.   

बॉलिवूडचा ‘किसर बॉय’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमरान हाश्मीबाबत तनुश्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. तनुश्री आणि इमरान हाश्मी यांनी ‘आश‍िक बनाया आपने’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात त्यांनी किसिंग सीनही केलं होतं. या सीनबाबतच तनुश्रीने काही खुलासे केले आहेत.

काय म्हणाली तनुश्री दत्ता?

माझ्यासाठी इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा पहिल्या दिवसापासून एक अभिनेता आहे. मी त्याच्यासोबत तीन चित्रपट केलं आहेत. आम्ही दोघांनी ‘चॉकलेट’मध्ये एक किसिंग सीन शूट केला होता. मात्र हा सीन नंतर कट करण्यात आला. पहिल्यांदाच असं काही चित्रित करणं खूपच विचित्र होतं, असं तनुश्री एका मुलाखतीत म्हणाली.

पुढे तीने सांगितलं की, “पहिल्या वेळेस मला फार वेगळं वाटलं. मात्र, दुसऱ्यांदा जरा कम्फर्ट वाटलं. कारण, वैयक्तिक आयुष्यात आमची कोणतीच केमिस्ट्री नाही. त्याला आता ‘किसर-बॉय’ म्हटले जाते. पण, तो रियल लाइफमध्ये तसा नाहीये. आम्ही दोघेही कम्फर्टेबल किसर नाही.”, तनुश्रीच्या या विधानाची आता चर्चा रंगू लागली आहे.

तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत

तनुश्री दत्ताने इमरानच्या (Emraan Hashmi) आशिक बनाया आपने, ढोल, भागम भाग, चॉकलेट, रिस्क, रकीब अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे ती चर्चेत आली होती. तीने ‘मी टू’ (MeToo) या मोहिमे अंतर्गत गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले होते.

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यांनी 2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमात एकत्र काम केले होते. याच सिनेमाच्या सेटवर नाना यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. नाना पाटेकर यांनी तनुश्रीने केलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर 2019 मध्ये पोलिसांनी त्यांना क्लिनचीट दिली होती. आता तनुश्री इमरान हाश्मीबद्दल (Emraan Hashmi) केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

News Title- Tanushree Dutta on Emraan Hashmi

महत्वाच्या बातम्या- 

Vijay Sethupathi | अवॉर्ड शोचा किस्सा सांगत विजय सेतूपतीने केला मोठा खुलासा!

MLA Disqualification | मोठी बातमी! निकालाआधी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

IPL 2024 Start Date l या तारखेपासून होणार IPL च्या सामन्यांचा जल्लोष सुरु

Shivsena MLA Disqualification Case l ‘महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार’; बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

MLA Disqualification Case | वकील असिम सरोदे यांचा अपात्रतेच्या निकालापूर्वी गंभीर सवाल; म्हणाले…