Post Office RD | भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे नवी स्कीम (Post Office RD scheme) खुली करण्यात आली आहे. यामध्ये रिकरिंग डिपॉझिट (RD) द्वारे ग्राहकांना वेळ पडल्यावर स्वस्त आणि सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्कीमसाठी काही नियमही ठेवण्यात आले आहेत. या स्कीमसाठी ग्राहक पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत खाते उघडू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट (RD)वर 6.7 टक्क्याने वार्षिक व्याज दिले जात आहे. त्यामुळे या आरडी खात्यावर ग्राहकांना केवळ हमी व्याजच नाही तर स्वस्त आणि सुलभ कर्जही उपलब्ध होणार आहे. जाणून घेऊयात या स्कीमबद्दल सविस्तर माहिती.
ग्राहकाला कर्ज केव्हा मिळणार?
ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये RD (Post Office RD scheme) खाते उघडण्यासाठी केवळ शंभर रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये मॅक्झिमम डिपॉजिटची कोणतीही लिमिट ठेवण्यात आली नाहीये. यासोबतच RD खाते तीन वर्षांनंतर वेळेपूर्वी बंदही करता येते. त्यानंतर खाते आणखी 5 वर्षांसाठी वाढवण्याचीही सुविधा आहे.
RD खात्यामध्ये ग्राहकाने 12 हप्ते जमा केले असतील आणि 1 वर्ष खाते चालू ठेवले असतील तरच त्याला कर्ज घेता येऊ शकेल. खातेधारकाला RD मधील शिल्लक रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंतच कर्जाची रक्कम म्हणून मिळू शकते.
5 वर्षांत घेतलेलं कर्ज फेडलं नाही तर…
पोस्ट ऑफिसच्या RD (Post Office RD scheme) वर कर्ज घेण्याचा व्याजदर हा बँकांकडून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत फार कमी आहे. सध्या पोस्ट ऑफिसच्या RD वर वार्षिक व्याजदर हे 6.7 टक्के आहे. म्हणजे खाते धारकाने कर्ज घेतल्यास, कर्जावरील व्याजदर 8.7 टक्के असेल.
खातेधारकाने 5 वर्षांत घेतलेले कर्ज फेडले नाही तर, कर्ज आणि व्याज हे आरडी खात्याच्या शेष राशीतून वजा केले जाणार आहेत. असे नियम पोस्ट ऑफिसकडून ठेवण्यात आले आहेत.
News Title- Post Office RD scheme
महत्त्वाच्या बातम्या-
LIC Jeevan Kiran Yojna l LIC ची ही भन्नाट योजना देईल बक्कळ पैसा; मिळेल सात पट रिटर्न्स
Rahul Narvekar | “उद्या ते निकाल अमेरिकेतून आणलाय असंही म्हणू शकतात”
Aishwarya Rai नेच ‘तो’ सल्ला दिला, अभिषेक बच्चनकडून मोठा खुलासा…
Vijay Sethupathi | अवॉर्ड शोचा किस्सा सांगत विजय सेतूपतीने केला मोठा खुलासा!