मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

Gold-Silver Price | सोनं (Gold) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आज मोठी गुड न्यूज समोर आली आहे. या आठवड्याची सुरुवात या मौल्यवान धातूच्या घसरणीने झाली. त्यामुळे खरेदीदारांची पावले आता सराफा बाजारकडे (Gold-Silver Price) वळत आहेत.

2024 च्या वर्षातील पहिल्या महिन्यात जानेवारीमध्ये सोने-चांदीचे भाव कमी झाले होते. जानेवारीमध्ये सोने 2200 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाले होते. डिसेंबर महिन्यात या किमती अधिक होत्या. आता फेब्रुवारी महिन्यात याच किमती काही अंशांनी कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र चांदीने उसळी घेतली आहे.

सोने-चांदीचे आजचे दर

सोने या आठवड्यात (Gold-Silver Price) 600 रुपयांनी स्वस्त झाले तर त्यात एकदाच 180 रुपयांची दरवाढ झाली आहे. तर, चांदीही 500 रुपयांनी वधारली आहे. 10 फेब्रुवारी रोजी सोन्यामध्ये 200 रुपयांची घसरण झाली. गुड रिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

चांदीचे दर वाढले आहेत. 9 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. त्यामुळे एक किलो चांदीसाठी तुम्हाला 75,000 रुपये मोजावे लागणार आहेत. सोने स्वस्त झाल्याने सराफा बाजारमध्ये खरेदीदारांची गर्दी दिसून येत आहे.

कॅरेटचा भाव कसा असणार?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आजच्या (Gold-Silver Price) सोने-चांदीच्या कॅरेटनुसार किमती ठरल्या आहेत. त्यानुसार 24 कॅरेट सोने 62,624 रुपयांना, 23 कॅरेट 62,373 रुपयांना, 22 कॅरेट सोने 57,364 रुपयांना झाले आहे. 18 कॅरेट 46,968 रुपये, 14 कॅरेट सोने 36,635 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

एक किलो चांदीचा भाव 70,638 रुपये झाला आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत होत असते.

News Title- Gold-Silver Price Today