Jio | जिओच्या सर्व ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!

नवी दिल्ली | सध्या टेलीकाॅम कंपन्यांपैकी जिओ (Jio) ही देशातील सर्वात आघाडीची कंपनी आहे. जिओनं आपल्या ग्राहकांना अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील काही प्लॅन अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत. त्यामुळं जिओचं सिमकार्ड वापरायला अनेकजण पसंती देतात.

जिओच्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर-

जिओने (Jio) ग्रहाकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणलीये. जिओ (Jio) च्या 909 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जाईल. हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. याचा अर्थ, तुम्हाला 84 दिवसांसाठी जास्तीत जास्त 2 जीबी डेटा दररोज दिला जाईल. तसेच, दररोज 100 SMS ची सुविधा दिली जाईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला Sony LIV, Zee 5 आणि जिओ TV चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल. याशिवाय जिओ Cinema आणि जिओ Cloud वर ऍक्सेस दिला जाईल.

Jio

Jio आणि Airtel या दोघांकडून फ्री डेटा ऑफर

जिओने एक वर्षापूर्वी 5G नेटवर्क आणलं आहे. 5G सेवा देशातील अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. सध्या जिओ आणि Airtel या दोघांकडून मोफत 5G डेटा ऑफर केला जात आहे. यासाठी किमान 249 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल.

जिओ आणि Airtel लवकरच 5G रिचार्ज प्लान लॉन्च करू शकतात. मात्र जिओ आणि एअरटेलकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, दूरसंचार कंपनी Airtel, Vi आणि BSNL शी स्पर्धा करते आणि मोफत Netflix सबस्क्रिप्शनसह दोन योजना देखील देते. जिओचा रु. 1,099 प्लॅन दररोज 2GB 5G डेटा ऑफर करतो, तर 1,499 रुपयांचा प्लॅन दररोज 3GB डेटा ऑफर करतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

Fighter Teaser | ऋतिक आणि दीपिकाचा हॉट अंदाज, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

Bollywood News | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास!

Ms Dhoni | “20 किलो कमी कर, मी तुला IPL मध्ये घेतो”; धोनीची ‘या’ धडाकेबाज खेळाडूला ऑफर

Pune Crime | ‘ती’ एक चूक बॉसला पडली महागात; कर्मचाऱ्याने केलं भयानक कृत्य

Mahua Moitra | महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द; वाचा काय घडलं संसदेत?