Fighter Teaser | ऋतिक आणि दीपिकाचा हॉट अंदाज, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

Fighter Teaser | बाॅलिवूडची डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी दिपवीर यांनी काॅफी विथ करण या शोमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर करणने दीपिकाला तिच्या पर्सनल लाईफबद्दल एक प्रश्न विचारला असता तिने असं काही उत्तर दिलं ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं.

दरम्यान, दीपिकाचे सिनेेमे पहायला तिचे चाहते कायम उत्सुक असतात. पठाणनंतर दीपिका कोणत्या चित्रपटात दिसणार यासाठी सर्वजण उस्ताही होते. मात्र, दीपिकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दीपिकाचा एक नवा चित्रपट तिच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

कोणता नवा चित्रपट येणार?

दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन या दोघांचा फायटर (Fighter teaser) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीझर देखील आऊट झाला आहे. दरम्यान, सध्या चर्चा आहे ती म्हणजे दीपिकाच्या हॉट सीनची. हृतिकसोबत दीपिकाने दिलेल्या या पोजची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

दीपिका आणि हृतिक या दोघांचा रोमँटिक सीन पाहून नेटकरी हैराण झाले. तर दुसरीकडे दीपिका आणि हृतिक या दोघांनी पहिल्यांदाज स्क्रीन शेअर केली आहे. फायटर या चित्रपटात त्यांच्यासोबत बाॅलिवूडचे नायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अनिल कपूर यांनी देखील काम केलं आहे.

Fighter Teaser: कधी येणार चित्रपट?

25 जानेवारी 2024 म्हणजेच प्रजासत्ताक दिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील त्यांचा लूक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले असून ही केमिस्ट्री पसंतीत उतरली आहे.

fighter teaser

या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले, या दिग्दर्शकाने यापूर्वी ‘पठाण’ आणि ‘वॉर’ यांसारखे दर्जेदार सिनेमे बनवले होते. या चित्रपटासाठी तर प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.

News Title : fighter teaser hrithik and deepika video

fighter teaser

थोडक्यात बातम्या-

Bollywood News | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास!

Ms Dhoni | “20 किलो कमी कर, मी तुला IPL मध्ये घेतो”; धोनीची ‘या’ धडाकेबाज खेळाडूला ऑफर

Pune Crime | ‘ती’ एक चूक बॉसला पडली महागात; कर्मचाऱ्याने केलं भयानक कृत्य

Mahua Moitra | महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द; वाचा काय घडलं संसदेत?

Skin Care | ग्लोईंग स्कीनसाठी रोज ‘या’ गोष्टी न चुकता करा