दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या Team India चं टेन्शन वाढवणारी भविष्यवाणी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | 10 डिसेंबरपासून भारत (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळणार आहे. पण त्याआधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचं टेन्शन (Team India) वाढवणारी भविष्यवाणी समोर आली आहे.

Team India चं टेन्शन वाढवणारी भविष्यवाणी

भारताने (Team India) तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे संघ आणि कर्णधारांची निवड केली आहे, त्यामुळे आता माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने या संघाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. संघ कोणत्याही फॉरमॅटमध्ये यजमान संघाला क्लीन स्वीप करू शकणार नाही, असं आकाश चोप्राने म्हटलंय.

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितलं की, भारत दक्षिण आफ्रिकेला कोणत्याही फॉरमॅटमध्ये क्लीन स्वीप करण्याची शक्यता नाही. याचं कारण भारत आपल्या सर्वोत्तम संघासोबत खेळत नाही. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे भारताने (Team India) तीन फॉरमॅटसाठी वेगवेगळे संघ निवडले आहेत.

T20 आणि ODI साठी जिथे विराट कोहली आणि रोहित शर्मा उपस्थित राहणार नाहीत. त्याचवेळी हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने सूर्यकुमार यादवची टी-20, केएल राहुलची वनडेसाठी आणि रोहित शर्माची कसोटीसाठी कर्णधार म्हणून निवड केली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघात अनेक नवे चेहरे

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या या तिन्ही संघात अनेक नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ही नवी नावे भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. दक्षिण आफ्रिकेचा युवा आणि वेगवान गोलंदाज मिहलाली पोंगवाना याची दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी निवड केली आहे. त्याने फर्स्ट क्लासमधील 18 सामन्यात 30 विकेट्स, लिस्ट ए मधील 36 मॅचमध्ये 44 विकेट्स आणि टी-20मध्ये 17 सामन्यात 11विकेट्स घेतल्या आहेत. तो भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. तसेच दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हिड बेडिंगहॅमचा समावेश करण्यात आला आहे.
28 वर्षीय नांद्रे बर्जर हा डाव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आहे. भारताविरुद्धच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची निवड झाली आहे.

दक्षिण आफ्रिका दौरा भारतासाठी (Team India) नेहमीच कठीण राहिला आहे. गेल्या दौऱ्यावर भारतीय संघाला कसोटी तसेच एकदिवसीय मालिकेतही पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता संघ यावेळी कशी कामगिरी करतो हे पाहण महत्त्वाचं ठरणारे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Bollywood News | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास! 

Pune Crime | ‘ती’ एक चूक बॉसला पडली महागात; कर्मचाऱ्याने केलं भयानक कृत्य

Mahua Moitra | महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द; वाचा काय घडलं संसदेत?

Skin Care | ग्लोईंग स्कीनसाठी रोज ‘या’ गोष्टी न चुकता करा

Gold-Silver Price Today | ऐन लग्नसराईत सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर