Bollywood News | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास!

Bollywood News | प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मेहमूद दोन महिन्यांपासून कर्करोगाशी लढत होते. त्यानंतर त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डाॅक्टरांनी मेहमूद कर्करोगाच्या लास्ट स्टेजला आहे, असं घोषित केलेलं.

अभिनेते मेहमूद यांचं निधन

अभिनेते मेहमूद यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या प्रकृतीबाबात समजल्यानंतर बाॅलिवूडमधील दिग्ज कलाकार त्यांना भेटायला जात होते. दरम्यान, आज मेहमूद यांनी वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची कॅन्सरशी झुंज सुरू होती. उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मेहमूद यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली देत आहेत.

Bollywood News : मेहमूद यांचं खरं नाव काय?

मेहमूद यांनी आपल्या अभिनयाने अनेकांच्या मनात घर केलं. ‘मेरा नाम जोकर’, ‘परवरिश’, ‘हाथी मेरे साथी’ यांसारख्या सिनेमामध्ये मेहमूद यांनी महत्त्वाची भूमिका साकारल्या होत्या. ज्युनियर महमूद यांचं खरं नाव नईम सैय्यद असं आहे.

पहिल्या सिनेमानंतर नईम सैय्यद यांना ज्युनियर मेहमूद असं नाव पडलं. नईम सैय्यद यांचा जन्म 1956 साली झाला. वयाच्या 9 व्या वर्षी ज्युनियर महमूद यांनी बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर 1968 साली ‘सुहाग की रात’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमात ज्युनियर महमूद यांना अभिनेते आणि गायक महमूद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

News Title : Bollywood News Actor Passed Away

थोडक्यात बातम्या-

Pune Crime | ‘ती’ एक चूक बॉसला पडली महागात; कर्मचाऱ्याने केलं भयानक कृत्य

Mahua Moitra | महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द; वाचा काय घडलं संसदेत?

Skin Care | ग्लोईंग स्कीनसाठी रोज ‘या’ गोष्टी न चुकता करा

Gold-Silver Price Today | ऐन लग्नसराईत सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

Devendra Fadnavis | महायुतीत वादाची ठिणगी?; फडणवीसांचा थेट अजित पवारांना इशारा