हार्दिक पांड्या OUT, प्रसिद्ध कृष्णा IN.. मात्र खरी लॉटरी लागली केएल राहुलला!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघ अभिमानास्पद कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी ठरला असून वर्ल्डकपमधील एकमेव अपराजित संघ आहे. या कामगिरीमुळे भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट नक्की झालं आहे.

भारतीय संघ चांगली कामगिरी करत असला तर एक टेन्शनची गोष्ट काही दिवसांपूर्वी घडली होती. पुण्यात बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पुढील सामने खेळता आले नव्हते. यासंदर्भात आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून हार्दिक पांड्या संपूर्ण वर्ल्डकपला मुकणार आहे. त्याच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाची संघात निवड करण्यात आली आहे.

…मात्र खरी लॉटरी लागली केएल राहुलची!-

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी हार्दिक पांड्याला वर्ल्डकपमधून वगळण्याची घोषणा केली. वर्ल्डकपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्याला उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं होतं. कर्णधार रोहित शर्माच्या बरोबरीने तो उपकर्णधार म्हणून काम पाहात होता. मात्र बांगलादेशविरुद्ध घोट्याला दुखापत झाल्याने तो उर्वरित सामने खेळू शकला नाही.

हार्दिक पांड्याला आता संपूर्ण वर्ल्डकपमधूनच वगळण्याची घोषणा झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाला नव्या उपकर्णधाराची गरज होती. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनूसार, बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी केएल राहुलच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे केएल राहुलवर मोठी जबाबदारी आली आहे. त्याची या वर्ल्डकपमधील कामगिरी पाहता ही निवड एकदम योग्य असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.

दरम्यान, भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये सध्या भन्नाट कामगिरी करतोय. भारतीय टीमने सलग 7 सामने जिंकून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. भारताचा पुढचा सामना रविवारी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना होईल.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘अजित पवारांमुळेच…’; मीरा बोरवणकरांचा नवीन आरोप

मोठी बातमी! मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय 

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा