जालना | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन केलं होतं. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यातील लाखो मराठा बांधवांनीही आंदोलनं केली. आपल्या कुटुंबाचा विचार न करता अनेकांनी टोकाची पाऊलं देखील उचलली.
मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार मराठा बांधवांना टोकाची भूमिका घेऊ नका असं आवहान देखील केलं. दरम्यान सरकार कोणताच ठोस निर्णय घेत नव्हता म्हणून अनेक तरुणांनी आपला जिव पणाला लावत आत्महत्या केली. सरकारकडून यांना चेक देऊन मदत करण्यात आली मात्र चेक बाउन्स झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
नेमका काय आहे प्रकार?
आत्महत्या करणाऱ्यांपैकी दोन तरुणांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं. सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना चेकही देण्यात आले होते. मात्र, हे चेक बाउन्स झाले आहेत.
तहसीलदारांची सही न जुळल्यामुळे हे चेक बाउन्स झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना चेकही देण्यात आले. मात्र हे चेक बाउन्स झाले आहेत. तहसीलदारांची सही न जुळल्यामुळे हे चेक बाउन्स झाल्याची माहिती आहे.
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील सुनील बाबुराव कावळे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. त्यांच्यापाठोपाठ गणेश काकासाहेब कुबेर यांनी देखील आरक्षणासाठी आपतगाव येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
थोडक्यात बातम्या-
खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा
जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा
भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!