खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच चिघळला आहे. अशात राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं म्हणून क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील सिद्धार्थ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली आहे. मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे, असं सिद्धार्थ शिंदे म्हणाले आहेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

2013 आणि 2014मध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच चिघळला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी अशोक चव्हाणांची समिती स्थापन केली. त्यानंतर नारायण राणे यांची समितीही स्थापन झाली. नंतर जेव्हा 2014मध्ये सत्ताबदल झाला तेव्हा गायकवाड आयोग स्थापन करण्यात आला. गायकवाड समितीने बराच अभ्यास करून अहवाल दिला. नोव्हेंबर 2018मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं, असं शिंदेंनी सांगितलं.

50 टक्क्यांच्यावर तुम्हाला का आरक्षण द्यावं? त्यासाठी एक्सेप्शनल केस म्हणून दाखवावं लागेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. इंद्रा साहनी खटल्यात आरक्षण 50 च्यावर आरक्षण जाऊ नये असा निर्णय दिला आहे. जर 50 टक्क्याच्यावर आरक्षण गेलं तर एक्सेप्शनल केस होते. त्यामुळे कोर्टाने महाराष्ट्राची मराठा आरक्षणाची केस ही एक्सेप्शनल नसल्याचं म्हटलं. तुमच्या केसमध्ये त्रुटी आहेत, तुमची एक्सेप्शनल केस नाहीये म्हटलं, अशी माहिती शिंदेंनी दिलीये.

एक तर कोर्टात इश्यू पेंडिग होता. नंतर रिव्ह्यू पिटीशन आता क्युरेटिव्ह पिटीशन, परत आंदोलन पेटलं त्यामुळे समिती नेमली गेली. आता सरकारनेही पुढाकार घेतला पाहिजे. आता सरकारने लवकर म्हणजे 31 मार्च पर्यंत कालावधी दिला आणि बजेट सत्रापर्यंत आरक्षण प्रस्ताव व्यवस्थित पास केला आणि केंद्राचाही दुजोरा घेतला तर आरक्षण मिळेल. कोणी कोर्टात गेलं तर केंद्रही सोबत असेल. त्यावेळी केंद्र सरकार काय म्हणेल नाही, ही पुढची गोष्ट आहे. पण 31 मार्च पर्यंत सरकारला वेळ द्यावा. त्यातून ठोस काही निघेल. मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा कसं करायचं ते सरकार ठरवेल. एक भरभक्कम आरक्षण मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

मराठा आरक्षण कधी ना कधी मिळेलच. फक्त वेळ लागेल. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आरक्षण देतील. हे मी कोणत्याही पक्षाचा म्हणून बोलत नाही. तटस्थ म्हणून सांगतो, असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महिलेनं केली मोठी फजिती!

राजू शेट्टींची सर्वात मोठी घोषणा; सांगितला पुढचा प्लॅन

मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता

दुसऱ्याच चेंडूनं केला घात!, वानखेडेवर हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!