ललित पाटील प्रकरणात चौकशीतून धक्कादायक माहिती उघड!

पुणे | ललित पाटील (Lalit Patil) पुणे पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याला मदत करणाऱ्यांची नावे उघड करण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी त्याला मदत कोण केली? या पद्धतीने चौकशी सुरु केली आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड होत आहे.

श्रीलंकेत जाणार होचा ललित पाटील

ललित पाटील ससूनमधून पसार झाल्यानंतर श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. पुणे पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे. ललित पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. न्यायालयाने बुधवारी ललित पाटील याच्यासह तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

ललित ससूनमधून पळाल्यानंतर नाशिक शहरात गेला होता. त्या ठिकणी त्याच्या मैत्रिणींकडून 25 लाख रुपये घेतले. त्यानंतर तो श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत होता. श्रीलंकेत जाण्यासाठी तो चेन्नईत गेला होता. चेन्नईमार्गे श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असताना मुंबई पोलिसांनी त्याला पकडले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का?; कायदेतज्ज्ञ स्पष्टच बोलले

भाजपविरोधात लोकांमध्ये रोष वाढतोय?, ही घटना आहे धोक्याची घंटा!

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महिलेनं केली मोठी फजिती!

राजू शेट्टींची सर्वात मोठी घोषणा; सांगितला पुढचा प्लॅन

मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता