राजू शेट्टींची सर्वात मोठी घोषणा; सांगितला पुढचा प्लॅन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

कोल्हापूर | पुढील वर्षी लोकसभेची निवडणुक ( Loksabha election) होणार आहे. त्यासाठी विरोधकांची तयारी चालू आहे. विरोधकांनी एकत्र येत इंडिया (India alliance) नावाची आघाडी स्थापन केली आहे. राज्यातील प्रमख विरोधी पक्ष इंडीया आघाडीमध्ये सामिल झाले आहेत. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Swabhimani shetkari sanghatana प्रमुख राजू शेट्टी ( Raju shetti ) यांनी मोठी घोषणा केली आहे.

आगामी लोकसभेची होणारी निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. निवडणुकीत भाजप (Bjp) आणि महाविकास आघाडी ( mahavikas aghadi) दोघांसोबतही जाणार नसल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी जाहिर केली. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील राजकीय गणितं बिघडणार आहेत.

राजू शेट्टी म्हणाले, मी कोणासोबतच युतीची बोलणी करणार नाही. मात्र कोणाला आमच्या सोबत यायचं असेल किंवा पाठिंबा द्यायचा असेल त्यांना नाही म्हणणार नाही. त्यांनी पाठिंबा दिल्यावर माझ्या प्रचाराला यायला हवं, अशी माझी अट नसल्याचं त्यांनी सांगितलं.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपली कोणाशीच आघाडी नसेल. ही निवडणूक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढवण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आपली ‘एकला चलो’ ची भूमिका आहे. माझ्या हजारो कार्यकर्त्यांच्या जिवावर ही निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले.

महाविकास आघाडी सोबत गेल्यानंतर वाईट अनुभव आला. त्यानंतर मी शरद पवार (Sharad pawar)  यांना सहा पानाचं पत्र लिहलं होतं. अद्याप त्यांचं उत्तर मिळालं नाही. त्यांना उत्तर द्यावंस वाटलं नसावं. त्यामुळे त्यांच्यासोबत कशाला जायचं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मी पुकारलेल्या ऊसदराच्या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा द्यायला हवा होता. मात्र त्यांनी तसं केलं नाही. मग का त्यांच्याकडे जायचं? माझी संघटना आणि माझे कार्यकर्ते माझ्यामागे उभा आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणावर अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता

दुसऱ्याच चेंडूनं केला घात!, वानखेडेवर हजारो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

“…अन् सगळेजण मला वाईट म्हणतील!”, रोहित शर्मा असं का म्हणाला?

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी

मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे सरकार जरांगेंना पत्र पाठवणार!