एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! ‘या’ कारणामुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी

ठाणे | एकीकडे मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रात वातावरण चिघळत असताना दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे.

ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा  शुभदीप नावाचा बंगला आहे. या बंगल्यात त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे तिथे कुटुंबीयांसह राहतात. दरम्यान या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणाऱ्या एका सर्विस रोडवरुन वाद निर्माण झाला आहे.

ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने हा सर्विस रोड बंद करण्यासाठी एक अधिसूचना काढली होती. मात्र त्याची शिंदे कुटुंबाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे सध्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड ट्रोल केलं जात आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

काय लिहिलं आहे पत्रात?

“आमच्या निवासस्थान परिसरातील वाहतूकीत बदल करण्याबाबत कोणतीही विनंती किंवा सूचना मी किंवा आमच्या कुटुंबियांनी केलेली नव्हती, तसेच अशा पद्धतीने पत्रक जारी करण्यापूर्वी आम्हाला पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती”, असं श्रीकांत शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे.

वाहतूक विभागाचे अतिउत्साही पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी परस्पर काढलेल्या या पत्रामुळे प्रसिध्दी माध्यमे आणि सोशल मीडियावर आमच्या कुटुंबियांची नाहक बदनामी केली जात आहे. चूक पोलिसांची आणि खापर आमच्या माथी, अशी अत्यंत संतापजनक परिस्थिती त्यामुळे उद्भवली आहे. आमचे येणे-जाणे सुकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही”, असं देखील श्रीकांत शिंदे यांनी पत्रात स्पष्ट म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी; ‘या’ कारणामुळे सरकार जरांगेंना पत्र पाठवणार!

मराठा आंदोलक आक्रमक; आत्तापर्यंत जीवे मारण्याचे ‘इतके’ गुन्हे दाखल

मनोज जरांगेंचा मराठा आंदोलकांना गंभीर इशारा!

आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे!

मनोज जरांगेंना अॅड प्रकाश आंबेडकरांचं पत्र; म्हणाले…