मराठा आंदोलक आक्रमक; आत्तापर्यंत जीवे मारण्याचे ‘इतके’ गुन्हे दाखल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बीड | मराठा आरक्षणामुळे बीड येथील परिस्थिती गंभीर झाली होती. बीडमध्ये राजकीय नेत्यांची आरक्षणावरुन सभा पार पडत असताना मराठा समाज आक्रमक झाला. नेते मंडळींच्या घरावर आंदोलकांनी जाळपोळ केला. त्यानंतर बीड येथे जमावबंदी करण्यात आली आहे.

बीड येथे तणावाचं वातावरण झाल्याने शहरात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. दरम्यान या ठिकाणी 20 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र या 20 पैकी सात गुन्हे हे जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे असल्याची माहिती समोर आलीये.

नेमकं काय आहे प्रकरण?

बीड येथे जाळपोळीच्या घटना अधिक झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या बंगल्यालाही आग लावण्यात आली होती. या सर्व घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. खासकरून बीडच्या घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. यामध्ये 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर याच 20 पैकी 7 गुन्हे हे जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे आहेत.

मराठा आरक्षणावरुण होत असलेल्या प्रकरणानंतर बीडमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बीडमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. तणावाच्या वातावरणामुळे तसेच बीडमधील तणाव अटोक्यात आणण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना वारंवार सांगूनसुद्धा आंदोलनाला गालबोट लागलं आहे. दरम्यान आज पार पडलेल्या बैठकीमध्ये सराकरने मराठा आरक्षणाला लवकरात लवकर न्याय देऊ, असं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-