…अशा पुरूषांकडे आकर्षित होतात महिला, संशोधनातून माहिती समोर

मुंबई | असं नेमकं काय असतं ज्यामुळं स्त्री एखाद्या पुरुषाकडं आकर्षित होते? हे कोडं समजून घेण्यासाठी जगभरातील मोठ्या विद्यापीठांचे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. जरी याविषयी अद्याप पूर्णपणे समजलेले नाही, परंतु संशोधकांनी काही मुद्दे उघड केले आहेत जे बहुतेक स्त्रियांमध्ये सामान्य असतात. अशा काही गोष्टी असतात ज्या पुरुषांमध्ये पाहून स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित होतात.

डेटिंगवरील अलीकडील संशोधनात असं काही प्रश्न डीकोड केले गेले आहेत. या संशोधनातून असं दिसून आलं आहे की अल्पकालीन नातेसंबंधांच्या बाबतीत स्त्रिया शारीरिकदृष्ट्या बळकट पुरुषांना प्राधान्य देतात.