‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार?; वाचा हवामान खात्याचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्यात ‘ऑक्टोबर हीट’मुळे हैराण झालेल्या नागिरकांना ऑक्टोबरच्या अखेरीस मात्र दिलासा मिळाला. कमाल व किमान तापमानात घट होत थंडीतही (Winter) वाढ झाल्यामुळे उन्हाचे चटके आणि उकाड्यापासून सुटका झाली आहे.

राज्यासह देशभरात गुलाबी थंडीची चाहूल (Winter) लागली आहे. पण नोव्हेंबर महिन्यात तुलनेनं गारठी कमी राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

थंडीचा जोर केव्हा वाढणार?

गेल्या काही दिवसांत मुंबई, कोकणसह राज्यातील तापमानात बदल झाला आहे. सकाळी हवेतील गारवा वाढला आहे. यामुळे ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पण, आता नोव्हेंबर उजाडताच तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवलीसह पनवेल आणि पालघरमध्येही पहाटे गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नोव्हेंबर महिनाच्या शेवटी मुंबई, ठाणेसह कोकणात थंडीचा जोर वाढणार आहे.

दरम्यान, न केरळच्या समुद्र किनार्‍यालगत अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘ती एक’ चूक भोवली; आमदार पितापुत्रांच्या अडचणी वाढल्या

‘या’ बड्या अभिनेत्रीमुळे योगी आदित्यनाथ अक्षरशः रडले!

‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण

मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई