‘ठरवलं तर पाच मिनीटात फडणवीसांचा आवाज बंद होईल’; जरांगे पाटलांचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | मराठा आरक्षणाचा ( Maratha reservation) लढा तीव्र झाला आहे. मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. मात्र सरकारने अद्याप मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घेतला नाही. काल सह्याद्री अतिथी गृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. आरक्षणासाठी आणखी वेळ द्यावा लागेल, असा निर्णय झाला. हा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarange patil) अमान्य करत सरकारला लक्ष्य केलं.

आमची माणसं मरत आहेत. आणखी किती बैठका घेणार? हे सरकार वातावरण दूषित करण्याचं काम करत आहे. नागरीकांचा सरकारवर रोष आहे. आमचं आदोलन शांततेत चालू आहे. आपण  काही आरेतूरे बोललो तर वाईट वाटते. फार बोलू नका, असे मला निरोप येत आहेत. आपण ठरवलं तर फडणवीसांचा ( Devendra fadnavis) पाच मिनीटात आवाज बंद होईल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.

प्रशासनातील आधिकारी सरकारचे ऐकत आहेत. उपोषणाच्या मंडपातून मराठा बांधवांना उचलले जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे हे कधीही दगाफटका करु शकतात, असा आरोपही जरांगे पाटलांनी केला.

सरकारने चर्चेसाठी यावं. आरक्षण देण्यासाठी का वेळ लागत आहे? आणखी किती वेळ लागणार आहे?  हे सरकारने स्पष्ट सांगावं. त्यानंतर मराठा समाज निर्णय घेईल, असं जरांगे पाटलांनी सांगितलं.

दरम्यान, आज काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर आज राज्य सरकारचे (State government)  शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी जाणार आहे. या शिष्टमंडाळाध्ये मुख्यमंत्र्यांचे सचिव असणार आहेत. ते कालच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर जरांगे पाटलांच्या सोबत चर्चा करणार आहेत. तसेच त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या  – 

‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार?; वाचा हवामान खात्याचा अंदाज

‘ती एक’ चूक भोवली; आमदार पितापुत्रांच्या अडचणी वाढल्या

‘या’ बड्या अभिनेत्रीमुळे योगी आदित्यनाथ अक्षरशः रडले!

‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण