‘घाणेरड्या डान्सवर…’; गौतमी पाटीलवर ‘या’ बड्या कलाकाराची टीका

मुंबई | गौतमी पाटीलनंतर आणखी एक डान्सर तरुणाईमध्ये विशेष चर्चेत आली, ती म्हणजे राधा पाटील. इन्स्टाग्रामवर राधा पाटील मुंबईकर या नावाने ती चांगलीच प्रसिद्ध आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना तरुणांची प्रचंड गर्दी असते. आता राधा पाटीलने गौतमीवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

लावणीचे पावित्र्य जपण्यासाठी या क्षेत्रात नव्याने आलेल्या कलाकारांनी कार्यक्रमात अश्लीलपणा करु नये. लावणीच्या कार्यक्रमात सध्या जो काही अश्लीलपणा सुरु आहे, तो नाही झाला पाहिजे. असे प्रकार बंद झाले पाहिजेत, असं म्हणत राधा पाटीलने गौतमीवर टीका केलीये.

नविन येणाऱ्या कलाकारांच्या घाणेरड्या डान्सवर समाजातून टीका होणारच ना. सुरेखा पुणेकर सांगतात त्याप्रमाणे, असं जर होत राहिलं तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असं ती म्हणाली.

राधा पाटीलचा नावावरून गौतमीला पाटीलला टोला?

आडनावावरून कलेशी प्रामाणिक राहून नृत्य केलं की नाव होतंच. गौतमी चांगलं नाचते. शेवटी आपण कसा डान्स करायचा ही ज्याची त्याची इच्छा असते. मला दुसऱ्यांच्या आडनावाचं काय माहीत नाही. मी तर खानदानी पाटील आहे. पाटील असल्याचे सगळे पुरावे देऊ शकते, असं राधाने म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार?; वाचा हवामान खात्याचा अंदाज

‘ती एक’ चूक भोवली; आमदार पितापुत्रांच्या अडचणी वाढल्या

‘या’ बड्या अभिनेत्रीमुळे योगी आदित्यनाथ अक्षरशः रडले!

‘स्वत:ची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण