‘…असं आरक्षण देता येणार नाही’; एकनाथ शिंदेंनी सांगितलं मोठं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक पार पडली. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं आहे. कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही दोन पातळ्यांवर काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या, असं आवाहन करतानाच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे.

इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका सर्वांनी घेतली. जुन्या नोंदीद्वारे दाखले देणंही सुरू केलं आहे. क्युरेटिव्ह पिटीशनवर चर्चा झाली. त्यामुळे आम्हाला कायदेशीर लढाईसाठी थोडा वेळ द्यायला हवा. त्यावर सर्वांचं एकमत झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

दरम्यान, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जाळपोळ आणि तोडफोडीच्या दुर्देवी घटना होत आहेत. त्यावर सर्वांनी चर्चा केली. शिस्तप्रिय आंदोलनाला गालबोट लागलं. हे आंदोलन हिंसात्मक पद्धतीने होऊ लागलं आहे. यावर आजच्या बैठकीत सर्वांनी नापसंती व्यक्त केली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजे ही भूमिका घेतली आहे, असं शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

मंत्रालयात राडा; आंदोलन करणाऱ्या आमदारांवर मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी! जरांगेंची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंनी फेटाळली

पुण्यात 500 मराठ्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला

मराठा आरक्षणावरुन आमदाराचं अत्यंत धक्कादायक वक्तव्य!