दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या (Gas Vy दरात वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिना सुरू होताच तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महाग केले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत 101.50 रुपयांची वाढ केली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे हे नवीन दर आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. नवीन दर लागू झाल्यानंतर आता राजधानी दिल्लीत एलपीजीचा व्यावसायिक सिलिंडर 1833 रुपयांना मिळणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या नवीन किंमती फक्त 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरवर लागू होतील. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये, पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 929 रुपये आहे. तर मुंबई, महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 902.5 रुपये आहे. चेन्नईतही घरगुती गॅस सिलिंडर 918 रुपयांना विकला जात आहे.

सलग दोन महिने महाग होत असलेला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरही सप्टेंबरमध्ये स्वस्त झाला होता. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 157 रुपयांची कपात केली होती, त्यानंतर हा सिलिंडर दिल्लीमध्ये 1522.50 रुपये आणि कोलकातामध्ये 1636 रुपयांना मिळू लागला. ऑगस्टमध्येही व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

मराठा आरक्षणावरुन आमदाराचं अत्यंत धक्कादायक वक्तव्य!

“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?

आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा

राज्यात मराठा आंदोलन पेटलं आणि भाजपचे हे नेते बघा कुठं फिरतायेत!

कांद्यानं उडवला हाहाकार!; भाव ऐकाल तर म्हणाल, आधी उगाच विकला???