राज्यात मराठा आंदोलन पेटलं आणि भाजपचे हे नेते बघा कुठं फिरतायेत!

मुंबई | मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील वातावरण तापले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या सात दिवसांपासून उपोषण करीत आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील सर्व गावातून नेते मंडळींना गावबंदी करण्यात आली आहे. आरक्षणाच्या मागणीचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे.‌

एकीकडे महाराष्ट्र होरपळताना दिसतोय तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे काही नेते बाहेर प्रचारासाठी गेल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर टीका केलीये. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला नव्हते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रश्न सोडून दुसऱ्या राज्यात भाजपच्या प्रचारास गेले होते. रायपूरमध्ये ते निवडणुकीचा प्रचार करत आहे. त्यामुळे त्यांना राज्य आणि राज्यातील प्रश्न किती महत्वाचे आहे? हे दिसून येत असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

दरम्यान, यापूर्वी प्रचारात गुंतलेल्या गृहमंत्री फडणवीसांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केलेली.

महत्त्वाच्या बातम्या-