मुख्यमंत्री शिंदेंची उडाली झोप, ‘हे’ मोठं कारण आलं समोर!

मुंबई | बीडमध्ये मराठा आंदोलनाला (Maratha Protest) हिंसक वळण आलं. मराठा आंदोलकांनी माझलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी जाळून टाकली आहे. तसेच त्यांच्या बंगल्याला आग लावल्याची घटना समोर आली. त्यानंतर माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्याला मराठा कार्यकर्त्यांनी आग लावली.

मराठा कार्यकर्त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यादेखील बंगल्याला आग लावल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जाळपोळीच्या घटना समोर आल्यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेतलीय. यावेळी त्यांनी आक्रमक मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सगळ्या घटनांवर लक्ष ठेवून आहेत.

ते या घटनांचा आढावा घेत आहेत. तसंच या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अलर्ट राहण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. काल रात्रभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झोपले नाहीत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-