मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरेंनी केली सर्वात मोठी मागणी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वात मोठी मागणी केली आहे. आरक्षणासाठी दिल्लीत दबाब गट तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी वेळ पडल्यास महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा, असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav ThackeraY) म्हटलं आहे.

मणिपूर जळतंय महाराष्ट्र पेटत आहे, नरेंद्र मोदी भाषण करून जातात. त्यांना काहीच फरक पडत नाही. यामुळे आता दिल्लीच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील सर्व मंत्र्यांनी गोयल, गडकरी, दानवे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला पाहिजे. अन्यथा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणालेत.

राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यातील परिस्थिती मांडायला हवी. राज्यात जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहिल्या आहेत, त्या तोडण्यासाठी फक्त संसदेत कायदा करुनच निर्णय घेता येईल. तो घेणार नसाल तर आम्ही मंत्रिमंडळातून राजीनामा देतो, असे राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

दरम्यान, एका उपमुख्यमंत्र्याला डेंग्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. दुसरे उपमुख्यमंत्री प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात गेले होते. त्यामुळे त्यांना राज्यातले प्रश्न किती महत्त्वाचे आहेत हे दिसून येतं, असं सांगत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-