राजीनामा देणाऱ्या आमदार-खासदारांना जरांगेंनी झापलं, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी नुकतंच खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या कारणातून आपण राजीनामा देत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंनी राजीनामा देणाऱ्या आमदार, खासदारांना झापलं आहे.

काही दिवसांसाठी राजीनामे देण्यापेक्षा दबाब गट तयार करावं, मुंबईतच थांबून सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यास भाग पाडावे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

दरम्यान, काही आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा का दिला आहे, हे माहीत नाही. त्यांच्या राजीनामा दिल्यामुळे मराठा समाजास काय फायदा होणार आहे आणि काय तोटा होईल, हे माहीत नाही. आमदारकी किंवा खासदारकी असेल तर ते सरकारवर दबाब तरी आणू शकतील. परंतु राजीनामे दिले तर ते रिकामे बसतील. आम्हीही रिकामे आणि तेही रिकामे. आत बोलायला कोणी तरी पाहिजे, असं जरांगे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-