‘मराठा…इस नाम का डर होना चाहिए’; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आरक्षण याच विषयाभोवती मागच्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा आंतरवालीत आंदोलन सुरु केलं. परिणामी राज्यातल्या प्रत्येक गावात, शहरात आंदोलनं सुरू आहेत. आरक्षणाला सर्व माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

सोशल मीडियाचा देखील मराठा आरक्षणासाठी जोरदार उपयोग केला जात आहे. सोशल मीडियावर देखील मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट व्हायरल होत आहे.

सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यात ‘मराठा…इस नाम का डर होना चाहिए’, असं लिहिण्यात आलं आहे. अनेकांच्या स्टेटसला, स्टोरीला, पोस्टला हा फोटो दिसत आहे. प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवर मराठा आरक्षणाबाबत पोस्टचा अक्षरशः पाऊस पडतोय. प्रत्येक घटना मीडियामध्ये येण्याआधी सोशल मीडियावर येत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या सात दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावत आहे. मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.

Maratha 1

महत्त्वाच्या बातम्या-