जरांगे पाटील बोलले विषय खल्लास!, “आता हा आमदार निवडून येणार नाही!”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

जालना | महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या ( Maratha reservation ) प्रश्नाने जास्तच पेट घेतला आहे. राज्यात विविध मार्गांनी आंदोलनं चालू आहेत. आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलक जास्तच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलन शांततेत चालू असतानाच, आंदोलनला गालबोट लागल्याचं पहायला मिळत आहे.

काल मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसवर दगडफेक केल्याची घटना घडली. अशातच राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke ) यांच्या घरावर दगडफेक करत गाड्यांना आग लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मनोज जरांगे पाटील ( Manoj jarange patil ) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

प्रकाश सोळंके यांची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंतर मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंकेंच्या निषेधार्थ त्यांच्या घरावर दगडफेक केली. या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास देऊ नये. आमचं आंदोलन शांततेत चालू आहे. मराठा भरकटत नाही. मुख्यमंत्र्यांनी वाचाळ नेत्यांना आवरावे. आमच्या वाट्याला गेल्यास मराठे सोडणार नाहीत. प्रकाश सोळंके सोसायटीतही निवडून येणार नाहीत, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. सकाळपासूनच आंदोलक आक्रमक झाले होते. आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ केली. तसेच त्यांच्या संबधित असणाऱ्या संस्थांवरही दगडफेक झाली. माजलगाव नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयाला देखील आग लावण्यात आली. सध्या शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. माजलगाव शहरात कडकडीत बंद होता, मात्र तरीही आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

महत्वाच्या बातम्या