“जरांगेंना काय झालं तर याद राखा,” मोठ्या अभिनेत्रीचा सरकारला इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अवघ्या राज्यभरात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण पेटलं आहे. मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे. त्यात सरकारला इशारा देऊन सुद्धा सरकार यावर कोणताच निर्णय घेत नाहीये त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसले आहेत.

जरांगेंच्या प्रकृतीबाबत आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) फेम अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) एक पोस्ट शेअर केली आहे.

जोवर मला बोलता येत आहे तोवर माझ्याशी चर्चा करा, पुन्हा चर्चा होणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले होते. अश्विनीने या विधानावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, “एक मराठा लाख मराठा…आणि पाटील साहेबांना काही झाले तर सरकारने त्याचीही तयारी ठेवा. मग आता आमच्यावर नुसते लाठीचार्ज करून उपयोग होणार नाही.” अश्विनीची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी आज सहा दिवस अन्न पाण्याला हात लावला नाहीये. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होऊ लागला आहे. गेले काही दिवस खाल्लं नसल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे. स्टेजवर देखील जरांगे जास्त वेळ बसू शकत नाही त्यामुळे ते झोपूनच इतरांशी संवाद साधत आहेत.

थोडक्यात बातम्या –