सर्वात मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ आमदाराचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बीड | मराठा आरक्षणासाठी सध्या काही नेते मंडळी कसलीच पर्वा न करता थेट पदाचा राजीनामा देत आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला, त्यापाठोपाठ आता बीडमध्ये सुद्धा भाजप आमदाराने राजीनामा दिला आहे.

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी भाजपच्या पहिल्या आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आलीये. बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार (Laxman Pawar) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा पाठवून दिला आहे.

कसलीच पर्वा न करता मराठा समाज आपल्या बांधवांना आरक्षण मिळून देण्याचा प्रयत्न करत आहे. तरी सुद्धा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्यांना विनंती करुन सांगितलं आहे, की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका, शिवाय आमदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं होतं.

पण तरीही आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झालं तर सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-