मराठा आंदोलनाला हिंसक वळण; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

पुणे | दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा (Maratha resevratio) लढा जास्तच तीव्र होत चालला आहे. मनोज जरांगे पाटलांचा (Manoj jarange patil ) आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. राज्यभरात अनेक गावांमध्ये साखळी उपोषणं सुरु आहेत.

मराठवाड्यात हे आंदोलन जास्तच तीव्र होताना दिसत आहे. काल मराठवाड्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडाळाच्या (Maharashtra State Road Transport Corporation) बसेसवर दगडफेक केली. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यात आंदोलनाने जास्तच पेट धरला आहे. एसटी बसेसवर झालेल्या दगडफेकीमुळे पुण्याहून मराठवाड्यातील जिल्ह्यात जाणाऱ्या बस रद्द केल्या आहेत. पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकातून मराठवाड्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे.

दरम्यान, काल एसटी महामंडाळाच्या 12 बसेसवर दगडफेक झाली. जालन्यासह इतर भागांमध्ये या घटना घडल्या. त्यामळे प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एसटी महामंडाळाने अनेक भागातील बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. जवळपास 3331 बसच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. जालना, लातूर, नांदेड,बीड, उस्मानाबाद जिल्ह्यतील बससेवर परीणाम झाला आहे. आंदोलनाची परीस्थीती पाहून बससेवा पूर्ववत केली जाणार आसल्याचं एसटी महामंडाळाकडू सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या