विराटला राग अनावर; आऊट झाल्यावर ड्रेसिंग रुममध्ये केलं ‘हे’ कृत्य, पाहा व्हिडीओ

लखनऊ | वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. इंग्लंडविरोधात विराट कोहलीला खातेही उघडता आलं नाही. 9 चेंडूचा सामना केल्यानंतरही विराट कोहली शून्यावर बाद झाला शुभमन गिल आऊट झाल्यानंतर विराट चांगली खेळी करेल अशी सर्वांना अपेक्षा होती. विराट शून्यावर बाद झाला. यामुळे भारताला सलग दुसरा झटका बसला आहे.

विराट कोहलीला राग अनावर झाला. ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीने राग बाहेर काढला. विराट कोहलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विराट कोहली यामध्ये खुर्चीवर जोरात हाताने मारत असल्याचं दिसतेय. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.

भारतीय चाहत्यांना विराट कोहलीकडून आज 49 व्या शतकांची अपेक्षा होती, पण चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली. विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ 2023 च्या विश्वचषकात भलत्याच फाॅर्ममध्ये असल्याने आजपर्यंत कोणीही रोखू शकलेलं नाही. रोहित सेनेने आतापर्यंत 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत.

https://twitter.com/scoutopp69/status/1718568204744978497?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1718568204744978497%7Ctwgr%5E272119167275ed1a258e35eeb87de1b7c0641d1c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fworld-cup-2023-virat-kohli-is-furious-with-himself-in-the-dressing-room-latest-marathi-news-udpate-1223631

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .