“मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा जीआर ठेवणार आहे का?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचंही प्राणांतिक उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचं राजकारण करत असेल तर महाराष्ट्रातील सामाजिक एकतेला हे सरकार चूड लावत आहे. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. ते हक्क त्यांना मिळायलाच हवे. ओबीसी आणि आदिवसींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर अशा अनेक समाजांना आरक्षण देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं, त्यासाठी जरांगे पाटील उपोषण करत आहेत. तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोकं आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार काहीच करत नाही. फक्त योग्यवेळी आरक्षण देऊ ही त्यांची भाषा आहे. मराठा समाजाच्या मृतदेहावर हे सरकार आरक्षणाचा जीआर ठेवणार आहे का?, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलावं आणि आदेश काढावा. शिवसेना फक्त समन्वयाची भूमिका घेत आहे. शिवसेनेला वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नये, असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-