मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fanavis) यांनी सरकार जरांगे यांच्यासोबत चर्चा करायला तयार असल्याचं म्हटलं. यावरूनच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला सवाल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कानात बोळे घातलेत काय? या म्हटलं ना, फक्त एकदाच चर्चेला या. मला बोलता येते का बघा. आजच्या आज या. त्यानंतर मला मला बोलता येणार नाही. माझी परिस्थिती आहे. फक्त एकदाच या. आरक्षण द्यायचं की नाही सांगा. बाकीची वळवळ करू नका, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिलं आहे.
फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली आहे. ते कमिटेड आहे. मी स्वत सांगतो, मुख्यमंत्र्यांची शपथ पूर्ण होण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार. सरकार गांभीर्याने काम करत आहे. त्यांनीही सरकारसोबत चर्चा केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राज्यातील अवघा मराठा समाज मराठा आरक्षणाकडे डोळे लावून बसलेला आहे. ठिकठिकाणी मोर्चे आंदोलनं होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसांची मुदत देऊनही सरकारकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- IND vs ENG | भारताला सलग दुसरा झटका!
- दुखापतीनंतरही रोहित शर्मा मैदानात, पहिला चौकार मारताच चाहते खुश
- रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धचा सामना खेळणार नाही?
- नारायण राणे यांच्याकडून मराठा कार्यकर्त्याला शिवीगाळ?
- आमदार आपत्रतेबाबत हालचाली वाढल्या; त्या ‘8’ आमदारांना नोटीस