रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धचा सामना खेळणार नाही? 

लखनऊ | वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आज भारतासोबत इंग्लंड विरोध सामना रंगणार आहे. सगळ्यांचं लक्ष सध्या आज होणाऱ्या क्रिकेट सामन्यावर लागलं आहे. त्यातच रोहित शर्मा आज पुन्हा शतक करणार का? याची उस्तुकता चाहत्यांना लागली आहे.

कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचा हा 100 सामना असणार आहे. मात्र रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक मह्त्त्वाची बातमी समोर आली आहे.

लखनऊच्या स्टेडियमवर क्रिकेटचा सामना होणार आहे. दरम्यान सामना होण्यापूर्वी मैदानात सराव करताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मनगटावर दुखापत झालीये. त्यामुळे तो आजचा सामना खेळणार का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्णघार रोहित शर्माचे चाहते त्याच्या बद्दल चिंता व्यक्त करत आहेत. मात्र आद्यापही रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत सध्या कोणतीही माहितीसमोर आली नाहीये. जर रोहितची दुखापत गंभीर असेल तर रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या-