‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry चा  मृत्यू; घरात सापडला मृतदेह

मुंबई | अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदवीर अभिनेता मॅथ्यू पेरी (Matthew Perry) याचं निधन झालं आहे. अभिनेता त्याच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मॅथ्यू याचं निधन हॉट टबमध्ये बुडून झालं आहे. ‘फ्रेंड्स-लाइक अस’मुळे मॅथ्यू याची लोकप्रियता प्रचंड वाढली होती.

मॅथ्यू पेरी हा अभिनेता जॉन बेनेट पेरी आणि कॅनडाचे पंतप्रधान पियरे ट्रूडो यांच्या प्रेस सेक्रेटरी सुझान मॅरी लँगफोर्ड यांचा मुलगा आहे. अभिनेत्याचा जन्म 19 ऑगस्ट 1969 मध्ये विलियम्सटाउन याठिकाणी झाला होता. अभिनेत्याने त्याच्या करियरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली.

फ्रेंड्स या सिटकॉममध्ये मॅथ्यूने ‘चँडलर बिंग’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. सहा मित्र-मैत्रिणींची ही कहाणी 1994 ते 2004 अशी दहा वर्ष सुरू होती. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ही मालिका उपलब्ध आहे. फ्रेंड्सच्या या दहा सीझनमध्ये मॅथ्यू यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

मॅथ्यू याने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. अभिनेत्याचं लग्न झालं नव्हतं. पण काही वर्षांपूर्वी अभिनेत्याचं मॉली हर्विट्ज़ हिच्यासोबत साखरपुडा झाला होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-