‘आरक्षण द्या अन्यथा…’; मराठा आंदोलकांचा उपमुख्यमंत्र्यांना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पंढरपुर | मराठा आरक्षणाचा (Maratha reservration) लढा जास्तच तीव्र होताना दिसत आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarange patil) पुकारलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातील मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यासोबतच राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्यात येत आहे. त्याचा मोठा फटका राजकीय नेत्यांना बसत आहे.

राज्यातील अनेक नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. पंढरपुरात होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला मराठा अंदोलकांनी (Maratha protest) विरोध केला आहे. शासकीय मंत्र्यांना पूजेला येऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.

येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. या दिवशी पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असते. मात्र सध्या राज्याला अजित पवार ( Ajit pawar ) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदाची शासकीय पूजेचा मान कोणाला मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अशातच मराठा अंदोलकांनी पंढरपुरात मंत्र्यांना येण्यास विरोध केला. तसे पत्र मराठा आंदोलकांच्यावतीने विठ्ठल मंदीर प्रशासनला दिले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजेला येताना आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच यावं. अन्यथा पुजेला येणारे उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासलं जाईल, असा इशारा मराठा अंदोलकांनी दिला आहे. तसेच यदांची शासकीय महापूजा वारकऱ्यांच्या हस्ते करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महात्वाच्या बातम्या