“मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्राची माफी मागा अन्…”

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) हल्लाबोल केलाय. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळेंच्या महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर भाजपच्या (Bjp) कार्यकाळात कसे उद्योग वाढले याचा पाढाचं वाचून दाखवला.

महाराष्ट्राची माफी मागा आणि महाराष्ट्रदोहीपणा थांबवा, असं म्हणत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीट करत सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) निशाणा साधला आहे.

खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राची दिशाभूल करत असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केलाय. कितीही हा महाराष्ट्रद्रोहीपणा आणि करंटेपणा. आपल्याच राज्याची प्रगती तुम्हाला सहन होत नाही का हो?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

कधी आयएसआय फंडेड वेबसाईटची माहिती सांगत महाराष्ट्रात विद्वेष पसरल्याचे सांगता, तर कधी महाराष्ट्रात उद्योग येऊनही उद्योग बाहेर चालल्याचा कांगावा पिटता. महाराष्ट्राची तत्काळ माफी मागा आणि हा महाराष्ट्रद्रोहीपणा थांबवा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

सुरत डायमंड बुर्स तयार होते आहे हे खरे आहे. पण, सुरत डायमंड बुर्स आणि मुंबईत असलेला भारत डायमंड बुर्स या दोन्हीच्या कार्यपद्धतीत फरक आहे. सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, तर मुंबई हे एक्सपोर्ट हब. या मुंबईच्या हबमधून एकही उद्योग सुरतेत गेलेला नाही. आता कान उघडे ठेऊन ऐका. इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रावर राज्य केलं, तेव्हा हा भारत डायमंड बुर्स ऑपेरा हाऊसमधल्या 5-6 इमारतीत विखुरला होता. आता तो आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वात बीकेसीत एका ठिकाणी आहे, अशी माहिती चित्रा वाघ यांनी सांगितली.

महत्त्वाच्या बातम्या-