“पवारांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही म्हणून काहीजण टीका करतात”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

सिंधूदुर्ग | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( narendra modi ) शिर्डीत आले होते. त्यांच्या हस्ते विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडलं. त्यानंतर झालेल्या जनसभेला संबोधित करताना महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते बरीच वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, अशी टीका शरद पवार (sharad pawar) यांच्यावर केली होती. त्या टिकेला खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सुप्रिया सुळे सिंधुदूर्ग जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या, शरद पवार यांना मोदी सरकारने पद्मविभूषण पुरस्कार दिला. प्रधानमंत्री कोणावर टीका करणार? अर्थातच शरद पवार साहेबांवर! महाराष्ट्रात कोणी आलं तर, पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय बातमी बनत नाही. हेडलाईन्स बनण्यासाठी टीका करतात. हेच आपलं नाणं मार्केटमध्ये खणखणीत चाललंय. प्रधानमंत्री आगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. त्यांनी यावेळी तसे आरोप केले नाहीत, असा टोलाही त्यानी लगावला.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी काल शिर्डीत शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. मोदी म्हणाले, काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारणच केलं. राज्यातील एक मोठे नेते केंद्रात अनेक वर्ष कृषीमंत्री होते. त्यांचा मी सन्मान करतो. मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असं नरेद्र मोदी म्हणाले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

महात्वाच्या बातम्या