जालना | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारवर मोठा आरोप केला आहे. मराठा समाजातील तरुणांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचलं, असं जरांगे म्हणालेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी काल मराठा आरक्षणाचा विषय घेतला नाही. याचा अर्थ त्यांना सांगितलं नाही. सांगितलं असेल तर त्यांनी जाणूनबुजून हा विषय घेतला नाही. ही शंका आहे, असं ते म्हणालेत.
इतक्या जवळ येऊन पंतप्रधान देशव्यापी आंदोलन घेत नाही याचा अर्थ त्यांना सांगितलं नाही किंवा त्यांनी घेतला नाही. त्यांनी विषय घेतला काय आणि नाही घेतला काय मराठ्यांना फरक पडत नाही. पण समाज यासाठी शांत होता की पंतप्रधान हा विषय हाताळतील आणि राज्य सरकारला हा विषय मार्गी काढायला सांगतील, असंही त्यांनी सांगितलं.
मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांच्या मनात पाप नव्हतं. वाईट नव्हतं. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्या विषयी वाईट भावना असतील तर मराठ्यांनी त्यांचं विमानही शिर्डीला उतरू दिलं नसतं, असं जरांगे पाटील म्हाणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- “…अन्यथा मराठ्यांनी नरेंद्र मोदींचं विमान देखील उतरू दिलं नसतं”
- ललित पाटील प्रकरणात नवा खुलासा; ठाकरे गटातील व्यक्तीचं नाव समोर
- नरेंद्र मोदींची शरद पवारांवर टीका; संजय राऊतांनी दिलं सणसणीत प्रत्युत्तर
- ‘आपण इतर देशांचा सामना करु शकत नाही’; नारायण मूर्ती थेट बोलले
- पार्थ पवारांचं राजकारणात कमबॅक?; मुलासाठी अजित पवारांनी खुर्ची सोडली?