“…अन्यथा मराठ्यांनी नरेंद्र मोदींचं विमान देखील उतरू दिलं नसतं”

जालना | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Resercation) सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात शिर्डी येथे आले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी मराठा आरक्षणाविषयी काहीही भाष्य केलं नाही. यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीये.

मराठ्यांच्या मनात पंतप्रधानांच्या मनात पाप नव्हतं. वाईट नव्हतं. जर मराठ्यांच्या मनात त्यांच्या विषयी वाईट भावना असतील तर मराठ्यांनी त्यांचं विमानही शिर्डीला उतरू दिलं नसतं, असं जरांगे पाटील म्हाणालेत.

महाराष्ट्रातील आरक्षणाचा लढा पंतप्रधानांना सांगितलेला नाही अशी शंका आहे. जर पंतप्रधानांना त्यांनी मराठा आरक्षण आणि आंदोलनाबाबत सांगितलं असेल, तर पंतप्रधान जाणूनबुजून आरक्षणावर बोलले नाहीत असं समजायचं का? याची शंका आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

इतक्या जवळ येऊन पंतप्रधान देशव्यापी आंदोलनाची दखल घेत नाहीत, याचा अर्थ त्यांना सांगितलेलं नाही किंवा त्यांनी तो विषय घेतला नाही. त्यांनी विषय घेतला काय आणि नाही घेतला काय? मराठ्यांना फरक पडत नाही, असं जरांगे पाटील म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-