नरेंद्र मोदींची शरद पवारांवर टीका; संजय राऊतांनी दिलं सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकरी मेळाव्याला संबोधित केलं. या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार (Sharad Pawar) कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असा सवाल नरेंद्र मोदींनी केला.

नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) शरद पवारांवर केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊतांनी मोदींना शरद पवारांनी गुजरातला केलेल्या मदतीची आठवण करून दिली.

शरद पवार कृषी मंत्री होते. किंबहुना शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जेवढी मदत केलीय तेवढी आताही होत नसेल पंतप्रधान असताना. भारतीय जनता पक्ष दुतोंडी आहे. त्याचा हा उत्तम नमूना आहे. दोन किंवा तीन वर्षापूर्वी शरद पवार यांचं कृषी क्षेत्रातील योगदान किती मोठं आहे, हे स्वत: बारामतीत येऊन सांगणारे आणि शरद पवार हे माझे राजकीय गुरू आहेत असं सांगणारे मोदी आता म्हणतात शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असं म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं? महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात म्हणजेच तुमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. देशभरात शेतकरी मरतोय. त्यांना मारण्यासाठी तुम्ही तीन काळे कायदे आणले. मग शेतकरी रस्त्यावर उतरला. एक वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी दिल्लीच्या सीमेवर, रस्त्यांवर धरणे आंदोलन करत होता. हे मोदी सरकारचं अपयश आहे, असं राऊतांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-