पुणे | राष्ट्रवादीचे(NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांचे(Ajit Pawar) सुपुत्र पार्थ पवार 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत मावळ मतदार संघातून उभे राहिले होते. पण शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठ्या मतांनी त्यांना पराभूत केलं. आता पुन्हा पार्थ पवार राजकारणात एंट्री करणार असल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांनी पार्थ पवार यांना सहकारच्या माध्यमातून राजकारणात आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा बँकेची निवड केली आहे. पार्थ पवार जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार आहे.
अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. पार्थ पवार यांच्यासोबत मदन देवकाते यांचे नाव संचालकपदाच्या निवडणुकीसाठी घेतलं जात आहे. परंतु पार्थ पवारच ही निवडणूक लढण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-